परिचय संकेतस्थळांचा - मानबिंदू.कॉम
मानबिंदू.कॉम नवीन मराठी चित्रपट, मराठी म्युझिक अल्बम्स, मराठी नाटकं, रंगमंचावर सादर केले जाणारे विविध कार्यक्रम, विविध क्षेत्रांत काम करणारे आघाडीचे मराठी कलाकार या संबंधीची संपूर्ण माहिती इंटरनेटच्या सहाय्याने लोकांपर्यंत पोहचवणारं मराठीतील एक आघाडीचं आणि नावीन्यपूर्ण संकेतस्थळ!
१००% मराठी असलेलं हे संकेतस्थळ विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर्सनी बनवलं असून इंटरनेटवरील अद्ययावत तंत्रज्ञान मराठीमध्ये यावं या हेतूने या संकेतस्थळाची स्थापना झाली आहे. प्रसिद्धीसाठी इंटरनेटच्या जोडीने sms या प्रभावी माध्यमाचा वापर करणारं मानबिंदू हे एकमेव मराठी संकेतस्थळ आहे.
यावर्षी प्रदर्शित झालेल्या गाभ्रीचा पाऊस आणि बोक्या सातबंडे या मराठी चित्रपटांच्या इंटरनेट प्रमोशनची संपूर्ण जबाबदारी मानबिंदूकडे होती. तसंच ’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, सनई चौघडे या चित्रपटांच्या इंटरनेट प्रमोशनसाठीही मानबिंदूने मदत केली होती. या व्यतिरिक्त एकीकडे स्वप्नील बांदोडकर सारख्या कलाकारासाठी मानबिंदूने काम केलयं तर दुसरीकडे पुण्यात झालेल्या जय हो या ए. आर. रेहमानच्या शोसाठी काम करण्याचा मान मिळवणारं मानबिंदू हे एकमेव मराठी संकेतस्थळ होतं.
वेगाने लोकप्रिय होणाऱ्या या संकेतस्थळाची पाने गेल्या वर्षभरात तब्बल १,६६,३५१ वेळा पाहिली गेली आहेत. [माहितीचा स्रोत : www.google.co.in/analytics] तसंच तरुणाईत खास लोकप्रिय असलेल्या मानबिंदूच्या ऑर्कुट कम्युनिटीचे सध्या ७५०० हून अधिक सदस्य आहेत.

