मराठीच्या क्षेत्रात नवं काही करावं, यासाठी अनेकजण धडपडताहेत. काहीजण मराठी टिकेल, वाकेल का मोडेल की नामशेषच होईल, याचीही चर्चा करताहेत. ’भाषा की तंत्रज्ञान’ असा एक वादही मध्यंतरी घालून झाला. या सर्वाला बगल देत मराठीच्या नावाने नुसतं चांगभलं न म्हणता अनेकजण प्रामाणिक प्रयत्नही खरोखरच करताहेत. सर्वच मंडळी स्वत:चं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्मान व्हावं म्हणून जणू काही स्पर्धेत उतरताहेत...
वेब माझा टिमला कोणाशीही स्पर्धा करण्याची इर्ष्या नाही. मात्र सहकार्याने नवीन पाऊलवाटांचा धांडोळा घेण्याची मात्र जरुर इच्छा आहे. त्यासाठी सर्व वाचकांचं आणि संभाव्य लेखकांच टीम वेब माझा तर्फे कायम स्वागतच होईल!
’निर्विवाद वेब-संवाद’ हे तर आमचं ब्रीद आहे.
शुचिष्मंत नि:स्वार्थ नेतृत्व यावे!
कला उद्यमे वैभवांनी फुलावे!
नवे ज्ञान साहित्य तत्त्वां भिडावे !
उभ्या भारती लोककल्याण व्हावे!
टीम वेब माझा
डॉ. अलका रानडे (पीएच. डी. मराठी) - संपादक
मंदार जोशी - सहसंपादक
अमित चिविलकर - वेब डिझायनर
महेश वाळुंज - ग्राफिक डिझायनर
सचिन देशमुख - मार्केटींग

